Home आरमोरी पी.आर.डी.स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी च्या विद्यार्थ्यांची भंडारा येथे आयोजित रनिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी .

पी.आर.डी.स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी च्या विद्यार्थ्यांची भंडारा येथे आयोजित रनिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी .

0
31

 

 

२ गोल्ड मेडल ,१ सिल्वर मेडल

 

भंडारा :- आज दिनांक ३ मार्च २०२४ ला श्री. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल भंडारा येथे भंडारा जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन द्वारा आयोजित भव्य मैदानी स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींच्या वयोगटात १०० मीटर दौड स्पर्धेत कुमारी. माही सुनील अवसरे प्रथम क्रमांक पटकावला तर

१० वर्षाआतील मुलांच्या वयोगटात ८० मीटर दौड स्पर्धेत कुमार. नकुल भक्तप्रल्हाद मेहेर याने प्रथम क्रमांक पटकविला तर १० वर्षाआतील मुलींच्या वयोगटात ८० मीटर दौड स्पर्धेत कुमारी.स्नेहल होमराज फटींग हिने दुतीय क्रमांक पटकविला विद्यार्थ्यांना आपल्या विजयाचे श्रेय आपल्या पालकांना व पी.आर.डी स्पोर्ट्स ब्रम्हपुरी चे संचालक राहुल जुआरे सर ,सहप्रशिक्षक कुंदन गायकवाड सर ,स्नेहा राऊत मॅडम यांना दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here